चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती

व्यायाम म्हणजे रात्री झोपताना ‘उद्या नक्की करू, आज वेळच झाला नाही’ अशी कमकुवत प्रतिज्ञा करणार्‍या सर्वांसाठी महत्वाची शास्त्रीय नोंद सादर करतो आहे. ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन या संस्थेने जवळजवळ ५० हजार कोव्हीड पिडित लोकांच्या व्यायामाच्या सवयींचा अभ्यास कोव्हीड-१९ साथी दरम्यान केला. इथे ५०००० चा आकडा लिहीण्याचा विशेष उद्देश असा आहे की एखादे निर्णायक अनुमान बांधण्यासाठी ‘सँपल साइझ’ फार महत्वाचा असतो आणि त्याची पूर्तता या अभ्यासाने केली आहे. त्यांनी बांधलेल्या निष्कर्षाचे आकडे आपल्या व्यायामाच्या सवयींवर प्रकाश टाकतात. या पेशंटचे ३ भागात वर्गीकरण करण्यात आले होते.

१ अजिबात व्यायाम न करणारे- म्हणजे एका आठवड्यात जेमतेम १० मिनिटे व्यायम करणारे. आता यांच्या व्यायामाला ‘व्यायाम ‘ हे नाव देणे कठीणच आहे. त्यांचा व्यायामाला शारीरिक हालचाल इतकेच काय ते आपण म्हणू शकतो २ अधूनमधून व्यायाम करणारे – आठवड्यात १० मिनिटे ते १४९ मिनिटे व्यायाम करणारे.या वर्गाचा पसारा फार मोठा आहे असे मला वाटते. आपल्यापैकी बरेचजण याच वर्गात मोडतात. ३ नियमित व्यायाम करणारे – हा एक आदर्श वर्ग म्हणायला हरकत नाही.

कोव्हीडमुळे हॉस्पीटलमध्ये दाखल होण्याची वेळ येणे, आयसीयुत हलवण्याची गरज भासणे आणि संसर्ग हाताबाहेर जाऊन मरण येणे याची संख्या आणि असे घडण्याची शक्यता नियमित व्यायाम करणार्‍यांपेक्षा ‘आळशी’ माणसांमध्ये लक्षणीयरित्या जास्त होती. इथे टक्केवारी पण देता येईल पण टक्केवारी महत्वाची नाही , धोका टाळणे महत्वाचे आहे. व्यायामाला नकार देण्यासाठी ‘सध्या तर आम्ही घरीच असतो’हे कारण अत्यंत तकलादू आहे. मानसिक गरज भासल्याशिवाय अभ्यास आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी आपल्याकडून होत नाहीत. अजूनही उशीर झालेला नाही. आठवड्याला फक्त १५० मिनिटे म्हणजे रोज २०/२५ मिनिटे ! आवडती मालिका बघता बघतासुध्दा हे आपण करूच शकतो. आयपीएलच्या चार ओव्हर्स बघता बघता पण हे आपण करू शकतो. आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी इतका वेल द्यायलाच हवा नाही का ?
लक्षात घ्या

“The pain you feel today will be the strength you feel tomorrow.”

Ravinder Singal
Ravinder Singal
https://ravindersingal.com
Quitters Don’t Win and Winners Don’t Quit. Ironman | Deccan Cliffhanger | Comrade Legend Finisher | Motivational Speaker | Writer | Endurance Athlete

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *