मुलांचे करिअर ठरविण्यापूर्वी नवी दिल्लीची वंदना सुफिया कटोच काय म्हणतेय अवश्य वाचा…
नवी दिल्ली येथील रहिवासी वंदना सुफिया कटोच या महिलेने मुलगा आमेरचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ६ मे २०१९ रोजी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये वंदनाने म्हटले होते, ‘माझ्या मुलाने दहावी बोर्डाच्या परीक्षेत ६० टक्के मार्क मिळविल्याचा अभिमान वाटतोय. होय, नव्वद टक्के नसले तरी त्याने काहीही फरक पडत नाही. कारण, तुला झगडताना मी पाहिलंय. कित्येक विषयांमध्ये अभ्यासात तुला खूप अडचणी आल्या. एका क्षणी तू माघार घ्यायचंही ठरवलं होतंस. पण शेवटच्या दीड ते दोन महिन्यांत तू अथक परिश्रम घेतलेस. तुला सलाम आहे आमेर… तुला आणि तुझ्यासारख्या अनेकांना जे मासे आहेत, पण त्यांचं मूल्यांकन त्यांच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवरून केलं जातं.’ वंदना सुफिया कटोच यांच्या पोस्टची प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि वेब पोर्टलसारख्या राष्ट्रीय माध्यमांनी दखल घेतली. आतापर्यंत १९ हजार लाईक, अडीच हजार कमेंट तर साडेआठ हजार लोकांनी ही पोस्ट शेअर केली. त्यावर हजारो पालकांनी समर्थनार्थ प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
आज २२ दिवसांनी या पोस्टची आठवण येण्याचं प्रमुख कारण म्हणजे नुकताच महाराष्ट्र बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल लागलाय. यामध्ये काही ९५ टक्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले असतील, तर काही ८५, ७५, ६०…काहीजण अगदी काठावरही असू शकतात. इतकेच नव्हे, तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा अंदाजे दोन लाखांच्या घरात आहे. जे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले त्यांचे फोटो व मुलाखती वृत्तपत्र, टीव्हीवर झळकतील. ज्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुणांनी उत्तीर्ण झाले त्यांच्याकडे कदाचित स्माशनशांतता असेल. जे नापास झाले त्यांचे तर विचारूच नका! वंदना यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाचं कौशल्य हे वेगळं असू शकतं. मग या विद्यार्थ्यांची क्षमता फक्त झाडावर चढण्यावरून कशी ठरवली जाते?
होय, वंदना सुफिया कटोचने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टशी मीही पूर्णपणे सहमत आहे. दहावी किंवा बारावीच्या टक्केवारीच्या आधारे पालकांनी मुलांचे भविष्य ठरविणे अत्यंत घातक ठरू शकते. पालक या नात्याने पाल्याच्या करिअरचा विचार करताना त्याचेही मत, आवडनिवड आणि कल लक्षात घ्यायला हवा. आजकाल एखाद्या क्षेत्राला आलेल्या प्रतिष्ठेमुळे आपल्या मुलाने अथवा मुलीनेही त्याच क्षेत्रात करिअर करावं असं बंधन पालक पाल्यांवर घालताहेत. स्वतःची प्रतिष्ठा पाल्यांच्या माध्यमातून वाढविण्यासाठी अमुक हेच शिक्षण घेण्याबाबतचा आग्रह त्यांना केला जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राचा उल्लेख करावा लागेल. बहुतांश विद्यार्थी इच्छा नसतानादेखील केवळ पालकांच्या हट्टापायी या क्षेत्राकडे वळताना दिसताहेत. अप्रत्यक्षरीत्या देशाच्या विकासात आपण खोडा घालतोय, असे मानायला हरकत नाही. असंख्य करिअरची क्षेत्रे खुली आहेत. त्याचबरोबर दहावी-बारावीचा निकाल म्हणजे आयुष्यातील शिक्षणाचा शेवट नव्हे, हे लक्षात ठेवावे.
सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या रॉय-बच्चन, अल्बर्ट आईन्स्टाईन, अजीज प्रेमजी, धीरूभाई अंबानी, मेरी कोम, वॉल्ट डिस्ने आणि कपिल देव यांसारखी असंख्य उदाहरणे आहेत ज्यांना शिक्षण झाले नाही अथवा शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र, आपल्या कौशल्याच्या बळावर त्यांनी उद्योग, खेळ, प्रशासन, विज्ञान, संशोधन आणि राजकारणासारख्या क्षेत्रांत निर्विवाद अधिराज्य गाजविले. यांसारखे व्यक्ती शिक्षणात पुढे नसतीलही कदाचित; पण खऱ्या आयुष्यात त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. हे विसरून चालणार नाही.
आजघडीला ॲनिमेशन अँड मल्टिमीडिया, डिझाईन, ब्युटी अँड हेल्थ मॅनेजमेंट, फॅशन टेक्नॉलॉजी, ज्वेलरी डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, योग थेरपी, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझ्म अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, फूड प्रोसेसिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, वैमानिक प्रशिक्षण, मरिन इंजिनिअरिंग, फूटवेअर डिझायनिंग, हिअरिंग हँडिकॅप, फिशरीज, चित्रपट क्षेत्रातील करिअर, ॲग्री बिझनेस, शिक्षण क्षेत्र, फिटनेस, बँकिंग, नर्सिंग, पत्रकारिता, मार्शल आर्ट, पर्यावरण, फाईन आर्ट, सायबर लॉ, नृत्य, डेअरी टेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, हॉस्पिटल मॅनेजमेंट, विमा, लायब्ररी सायन्स, फिजिओथेरपी, नौदल, वायुसेना, आर्किटेक्ट, इंटेरिअर डिझायनिंग, रुरल मॅनेजमेंट यांसारखी एक ना अनेक क्षेत्रं आवडीनुसार सर्वांसाठी खुली असतात. पालकांनी पाल्याच्या आवडीनुसारच त्याचे करिअर निवडल्यास विद्यार्थीही आनंदाने यशाचीच पायरी चढतील.
त्याशिवाय कित्येक असे विद्यार्थी आहेत जे दहावी अथवा बारावीत अनुत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी न थकता पुन्हा प्रयत्न करून यश मिळविले. अगदी त्याचप्रमाणे कित्येकजण स्पर्धा परीक्षेत पहिल्यांदा अपयशी ठरतात. मात्र, अपयशाला न घाबरता पुन्हा पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न ते आयएएस, आयपीए, आयआरएस यांसारख्या सेवांमध्ये कार्यरत झाल्याचीही उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात.
बारावीमध्ये आपल्या पाल्याला किती गुण मिळाले हे न पाहता त्याचा कल काय आहे हे ओळखून त्याचे करिअरचे क्षेत्र निवडावे. आमेरची आई वंदना सुफिया कटोचप्रमाणे धारिष्ट्य दाखवून मुलांचे भविष्य चांगले करण्यास प्राधान्य द्यावे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
18 comments
Didn’t understand fully as it’s in marathi but still could get the essence and found it encouraging and against the stream which is refreshing.
अगदी खरं आहे,
मुलांना त्यांचे करियर निवडण्याची मोकळीक व संधी देणे आवश्यक आहे.
खूप मार्गदर्शन पर आर्टिकल, सर..!! तुम्ही बऱ्याच नवीन नवीन क्षेत्रांचा यात उल्लेख केला आहे .त्याच्यामुळे खूप पालक त्या क्षेत्रांचा विचारही करत नसतील असे लोक नक्कीच मुलांच्या करियरसाठी या विविध क्षेत्रांचा विचार करतील.
मी माझ्या मुलाच्या बाबतीतही असाच डिसीजन घेतलाय. त्याचा कल शिक्षणाकडे नव्हता .आर्ट, ग्राफिक डिझायनिंग ज्याच्याकडे जास्त कल होता .बारावीपर्यंत जेमतेम त्यांनी शिक्षण केलं पण जबरदस्तीने त्यांना शिक्षणात ओढण्यापेक्षा डिझाइनिंग करण्याची परमिशन दिली . आता कुठल्याही तणावाखाली न राहता तो घर बसल्या त्याचे डिझाईनिंग चे काम घेतोय आणि स्वतःचा खर्च स्वतः कमवतोय… यात पुढे डेव्हलप कसं व्हायचं किंवा अजून नवीन काय करायचं याचा मार्गही स्वतःच शोधतोय…. आम्ही त्याचे फक्त ग्रेट सपोर्टर बनुन त्याच्या सोबत असतो..
सर तुमची ही मागदर्शन पर लेखमाला खूप सुंदर मांडताय…!!
.तुमच्या लिखाणासाठी अनेक शुभेच्छा…!!💐💐
अगदी बरोबर आहे .
मुलांना आवडीप्रमाणे करियर निवडण्याची संधी द्यावी.
पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये .
Very true !! If you ask and ask fish or a whale to climb a tree, its failure of examination system . A fish needs to be tasted in a water only. A change in the attitude of parents and teachers needed.
The way you write about these things really enlighten others. Apan aplya mulanna protsahan kela pahije and tyancha support system rahaila pahije.
खुपच छान मार्गदर्शन मिळाले।।
नक्कीच चांगला फायदा होईल।।
भरपूर माहिती मिळाली – मनःपूर्वक आभार।।
धन्यवाद।।
Hon’ble sir..Artical is really benificial to those students and parrents who scored less marks in 12th exam..and confused about future..what to do ahed?
….this artical motivate positively to that students..thanks sir such right time artical…
आदरणीय सर, आपला मार्गदर्शनपर लेख उत्कृष्ट आहे, प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहणे आवश्यक आहे,
पुढील मार्गदर्शक लेखासाठी शुभेच्छा
सर, आमेरच्या आई वंदना सुफिया सारखी स्त्री प्रत्येक घरात पाहिजे आपल्याशी चर्चा करत असतांना आपण म्हणाले होते की, इंजिनिरिंग, आयटी, मेडिकल ला मुलांना प्रवेश देऊन आपण निवृत्तीनंतर /म्हातारपणी स्वतःला एकटे राहण्यास भाग पाडत असतो कारण ही मुलं नंतर विदेशात जाऊन तेथे स्थाइक होतात . क्षमता असेल तर काही हरकत नाही, परंतु अभ्यासावरून घरात होणार कलह आपल्याला चांगला माहीत आहे. मुलांच्या आवडी प्रमाणे त्याचा कल बघून त्याला वाव देने योग्य परंतु तो कल देखील त्या दिशेला वळवणे हे देखीलआई वडिलांचे काम आहे .आमिर खानच्या 3 idiots मधिल फोटोग्राफर चे करियर सिनेमा पुरते ठीक आहे सर आताच 12वी चा result लागला आहे ,असा लेख वाचून कमी मार्क मिळालेली किंवा नापास झालेल्या मुलांना प्रेरणा मिळेल. कुटुंबातील वाद विवाद कमी होतील छान लेख
Yes, our system tests students abilities and capabilities on the basis of marks they get..it’s like checking how fast a fish can climb a tree! Very rediculous!
Rightly presented the thoughts. Great article..maybe eye opener for many parents.
खूप छान
वास्तव मांडलं सर…..
Sir tumche sagle lekh khupach prerna denare aahet.anna hajare suddha napas mulana navi umed detat.khari garaj napas ani kami gun milale tyana dhir dene ani kautuk karnyachi aste.aaplya mulachi dusrya konabarobar tulna karne hech mulat chuk aahe..atyant sundar lekh,palak ani vidyarthi yanna khup margdarshak,vandana sufiya yanche kautuk…dhanyawad sir..
Really Each one should appreciate your efforts to convey the message to society , which is just behind the Mark’s instead of expertization or liking of our childrens , in which they really can make miracle.
I salute your way of thinking , & appreciate your message which can help to build up our nation. Hat’s off to you & All the best for such meaningful writing in future too.
सर ,प्रेरणादायी लेख , ,खूपच आशा वादि व सर्व साठी उपयुक्त आहे
आदरणीय सर,
अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शनपर लेख असून खरोखर प्रत्येक पालकांनी याचे अवलोकन केल्यास पुढील पिढीच्या भाविष्यास याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल…
धन्यवाद सर…
Respected sir jaihind…
Very nice and useful article sir…
Particularly you are budgeting and trying to take full advantage of your
means. The spacing of the text lines and paragraphs furthermore make website content more readable.
Submitting articles to article databases with strong ranking. https://918kiss.poker/casino-games/75-sky777