Kuchh To Log Kahenge, Logon Ka Kaam Hai Kehna...!
‘कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम हैं कहना…’
एक बेडकांची वसाहत होती. या वसाहतीला लागूनच एक उंच टॉवर होता. या टॉवरच्या उच्च टोकावर आपण जाऊ शकू का? असा विचार त्या वसाहतीतील प्रत्येक बेडूक करायचा; मात्र प्रत्यक्ष सुरवात करायला कोणीही तयार होत नसे. एके दिवशी सगळ्या बेडकांनी ठरविले की काहीही होवो, आपण सर्वजण मिळून टॉवरवर चढूया. बघूया नेमकं काय आहे तिकडे. हो-नाही करत सर्वजण टॉवरवर चढायला तयार झाले. प्रत्येकजण एकमेकांशी चर्चा करून आपापली रणनीती ठरवू लागला. काहींचे मत आपण हा टॉवर चढूच शकत नाही असे होते, तर काहींना मात्र आपण अर्ध्यापर्यंत जाऊ शकतो, असा विश्वास होता. त्यांच्यापैकी काही अतिउत्साही बेडूक म्हणाले, ‘यात काय एवढं कठीण? हा टॉवर तर आपण सहज पार करू शकू.

…अखेर टॉवरवर चढण्याचा दिवस उजाडला. सर्वजण आत्मविश्वासाने सावध झाले. एक-एक बेडूक टॉवरच्या प्रत्येक बाजूने मिळेल त्या जागेवरून चढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यातील निम्म्याहून अधिक टॉवरवर चढण्यापूर्वीच गारद झाले. जे चढण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना खाली राहिलेले बेडूक सल्ला देत होते. या गोंधळात उरलेल्यांपैकी कित्येक बेडूक अर्धा टॉवर सर करेपर्यंत खाली पडले. अगदी बोटावर मोजण्याइतपत बेडकांनी निम्मा टॉवर मोठ्या शिफातीने सर केला. मात्र, टॉवरच्या सर्वोच्च टोकापर्यंत ते सर्वजण पोहचू शकले नाहीत. त्यांच्यापैकी एक बेडूक शांततेने स्वतःवर बाहेरच्या वातावरणाचा कुठलाही परिणाम होऊ न देता आपले काम करीत होता. पाहता-पाहता तो टॉवरच्या उच्च टोकाला जाऊन पोहचला. तेथून त्याला उंच पर्वत, खळखळून वाहणाऱ्या नद्या, नाले, मोठमोठी झाडे, वेगवेगळे पक्षी दिसले. त्या निसर्गसौंदर्याने पुलकित होऊन तो जेव्हा खाली उतरला तेव्हा सर्व बेडूक त्याची उत्सुकतेने वाट पाहत असल्याची त्याला जाणीव झाली. खाली उतरताक्षणीच प्रत्येकजण त्याला प्रश्न विचारू लागला, ‘कसं काय शक्य झाल? भीती नाही वाटली का? उंच टॉवरवरून काय-काय दिसले?’ असे अनेक प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडले. पण, कोणत्याही प्रश्नावर प्रत्युत्तर न देता तो त्याच्या जागेवर गुपचून जाऊन झोपला. हे पाहिल्यावर सर्व बेडकांची अशी धारणा झाली, की या उंच टॉवरवर चढलेल्या बेडकाला काहीच ऐकू येत नाही. यामुळे सर्वजण जोरजोराने हसत होते, पण तो बेडूक मात्र शांत झोपला होता.

थोडक्यात, या कथेचे सर सांगावयाचे झाल्यास आपलीही अवस्था या कथेतील बेडकांसारखीच असते. आपले कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी, मार्गदर्शक, कार्यालयीन सहकारी असे बरेचजण आपल्या संपर्कात असतात. यांच्यापैकी काहीजण फक्त बोलघेवडे; पण कृतिशून्य असतात. असे लोक करत काहीच नाहीत. काहीजण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात; मात्र सुरवातीलाच सपशेल हार मानतात. काही यशाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना न मागता सल्ला द्यायला लागतात अन् हे सल्ले ऐकून अर्ध्यावरच त्यांचा यशाचा प्रवास थांबतो.
आपल्या आजूबाजूला बोटावर मोजण्याइतके लोक त्या ऐकू न येणाऱ्या बेडकासारखे असतात. जे ध्येय ठरवून आपल्या अनुभव आणि शिक्षणाच्या जोरावर ध्येयाकडे अविचलपणे वाटचाल सुरू करतात. वाटेत त्यांना अनेकजण भेटतात. काहीजण त्याच्या यशांच कौतुक करतात, काही सल्ले देतात. यातील काहीजण प्रोत्साहनही देतात. मात्र, या कुठल्याच बाबींना भुलून न जाता आपला मार्ग ते सोडत नाहीत. कौतुकाने हुरळून न जाता आपले काम सातत्याने करीत राहतात. काही कालावधीनंतर एक दिवस उजाडतो… तेव्हा त्यांनी यशाचे शिखर गाठलेले असते. तरीही प्राप्त यशाने हुरळून न जाता ते पुन्हा आपला नित्यक्रम सुरू करतात. अगदी कथेतील काहीही ऐकू न येणाऱ्या बेडकाप्रमाणे. कारण, त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणाचा किंचितही चांगला अथवा वाईट परिणाम होत नाही. ही स्थितप्रज्ञ अवस्थाच असते त्यांच्या यशाचे खरे गमक.
‘लोक काय म्हणतील?’ याचा विचार न करता तुम्हाला जे काही करण्याची प्रबळ इच्छा आहे ते जरूर करा. तुम्ही काहीच केले नाही तरीदेखील लोक तुम्हाला नाव ठेवणार हे अगदी निःसंदेह आहे. त्यामुळेच म्हणतात ना, ‘सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग?’
अजित खंदारे
बिलकुल सही फर्माया सर आप ने | आपल्याला पुढे जायचे असेल तर लोक काय म्हणतात याचा विचार करू नये. छान कथा.
अजित खंदारे
बिलकुल सही फर्माया सर आप ने ! आपल्याला पुढे जायचे असेल तर लोक काय म्हणतात हा विचार करून चालत नाही. छान कथा.
Manoj Karanje
आदरणीय सर,
खुपच छान विचार आहेत ..खरोखर प्रतयेकाने अंमलात आणले पाहीजे…Realy Great Sir
Bajirao Mahajan
Khup Prerna dayi katha aahe sir..aapan suddha ashach prakare lakshya kendrit karun ironman kitab jinkla aahe…aamhi sakshidar aahot…there is no shortkut for grand success…thank u so much sir I
BHAMARE NIMBA
Truly said Sir. We must be target oriented always without thinking much about others. We always should take cognisance of our own mind and continue.. Thanks for sharing sir
sachin joshi
अप्रतिम लिहिले आहे सर..
आपण लोकांचा इतका विचार करतो की आपल्याला जे करायचं आहे ते राहून जातं.
सायकॉलॉजी च्या भाषेत याला आपण आऊटर फेस असं म्हणतो आणि जेवढा outer face stong असेल तेवढा आपण मानसिक दृष्ट्या दुबळे बनतो आणि आजारी असतो.
लोक काय म्हणतील याची पर्वा न करता लोक गेले खड्ड्यात… मला जे योग्य वाटतं.. माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल तेच मी केलं पाहिजे हा विचार तुम्ही या लेखा मध्ये अप्रतिम पद्धतीने मांडला आहे.. सर असेच तरुणांसाठी लिहित रहा..👌👌👌😊👍
Priyanka Ramhari Ekhande
Actully Agreed Sir…Always You Make Us feel motivated… Miss You Sir..#Cyber Ambassader
Ketanbhai shah
Yes.. it’s very good thoughts..
One has to go ahead.. with out thinking what others saying you..
Don’t worry about what opinion others are having for you..
Yes.. definitely you can take all thought which motivates you..
Self confidence is best ..
Be around those people.. who is positive with their thoughts in life
Tarannum kadri
Very inspiring story. Focus and determination indeed , key to success .
Thank you Sir for sharing your thoughts👍🏻
Sheetal Gaikwad
Yes sir ! Very motivational
RAMESH R SHYAMSUKHA
IT IS TRULY A GIFT TO HAVE A FRIEND LIKE YOU WHO GROWS MORE PRECIOUS WITH THE YEARS…JINDAGI EK SUHANA SAFAR HE LOUT KE VAPAS NAHI MELEANGI SIRJI APP SE PRERNA MULTI RAHE JEEVAN ME ANAND HI ANAND HE….
Dr Shekhar Chirmade
Excellent write up Sir. Dedication and hardwork is key to success.
मिलिंद बागुल
महोदय खूप छान वाटले , मी आतापर्यंत खूप कविता केल्या, चित्रे रंगविली, स्केच काढले, व्यंग चित्रे काढली, गिटार शिकलो, आता बासरी वाजविण्याची शिकत आहे, स्वयंपाक करून मित्रांना आमंत्रण देणे हा माझा छंद आहे ,आपली प्रेरणा आणि आशीर्वाद आहेत म्हणून खूप उत्साह वाटायला लागला आहे . धन्यवाद सर.
pradeep v jagtap
सर तुमचे छंद अनुकरणीय आहे माणसाने फंदात पडणे ऐवजी छंदात पडावे तुम्ही नाशिकसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा असाच गुणगौरव व समाजसेवा आपल्या हातुन घडवेत याच शुभेच्छा
तुकाराम गंगाधर नवले
सर खूप छान गोष्ट आहे….
नेमकं हेच होत आपल्या आयुष्यात….
म्हणून सक्सेस नाही मिळत…
खूप छान मार्गदर्शन झालं….
भारीच…👍
Smita Joshi
खरंच खुप छान विचार आहेत सर तुमचे .
लोकांचा विचार केला तर कधीच जीवनात पुढे जाऊ शकणार नाही .
Hiren Gandhi
Super stuff great in-depth knowledge u have and put it in such a easy language
Dr Baba. V. Dakhore
सबसे बडा रोग
क्या कहेंगे लोग
Anil Pawar
Very very motivational story Sir,
Keep on writing
Thanks
Monali Gorhe
Thank you sir for sharing story its inspirational for our shooting sports too…
Ar Pramod CHAUGULE
Sirjee
U on the dot.
Should think n implement
Sunita Bhagure Chauwhan
Great motivational story ,sir..!!
And You are the best example ; focused, hardworking n down to Earth.
Dr Sitaram Kolhe
Hon’ble sir..its really true..for achive the destination and for stress free life ..it is important to follow this..
Api Sarika Ahirrao
Respected sir jaihind…
Very true sir…..
Successful person jar lokanchya bolanyakade laksh det rahila tar to pudhe jauch shakat nahi…tyasathi bedakache atishay yogya ani uttam example dile ahe sir aapan…very nice article sir!!!
Aditya Mirkhelkar
Very Nice Article sir
Ashok Bhagat
आदरणीय सर ,खूपच छान आहे, यशस्वी होण्यासाठी,
लोक काय बोलतात, त्या कडे लक्ष केंद्रित न करता आपले काम करीत राहिले पाहिजे
Ruchi agrawal
Very nice said sir,i salute u ,ur thoughts are really motivational for us,its really something which if everyone implements in their life Dan the world would be a different place,thanks a lot sir
tqNbAKLmYHf
yrYfMLIDgPVR