एका अज्ञाताने म्हटलेलं आहे की, ‘दी बेस्ट व्ह्यू कमस् आफ्टर दी हार्डेस्ट क्लिंब’ हे आपले आयुष्य आणि ट्रेकिंगच्या बाबतीतही अगदी तंतोतंत खरे आहे. निसर्गाची सुरूवात आणि शेवटही डोंगरांनीच होते. त्यामुळे सर्वोत्तम निसर्ग बघायचा असल्यास उंचावर नक्कीच जावे लागेल. त्यासाठी ट्रेकिंगसारखा दुसरा कुठलाही पर्याय नाही. मात्र, ट्रेकिंग करताना काय काळजी घ्यावी, त्याचे फायदे काय, हे ही माहित असायलाच हवे. माझ्या मते, मॉन्सूनसारखा दुसरा कुठलाही ऋतू ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम असू शकत नाही.
जून संपल्यानंतर महाराष्ट्रासह भारतात जवळपास सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात का होईना मान्सूनने हजेरी लावलेली असते. या काळात ऋतूमध्ये होणाऱ्या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, ॲलर्जी आणि इन्फेक्शनचाही धोका असतो. वाढलेले वजन आणि आरोग्याच्या संकटावर मात करण्यासाठी व्यायामासारखा दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही. यामध्ये रनिंग, सायकलिंग, स्वीमिंग, जिम, योगा आणि ट्रेकिंगसारखे पर्याय अधिक चांगले ठरतात. यापैकी ट्रेकिंग हा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. ट्रेकिंगमुळे फक्त शारीरिक नव्हे, तर मानसिकदृष्ट्या बळकट होण्यास मदत होते. पावसामुळे निसर्ग बहरण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे मेंदूला सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम ट्रेकिंग करते. ट्रेकिंगमुळे होणारे काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
– ट्रेकिंग म्हणजे कायकरताना चालणे, चढणे, शरीराचा समतोल राखणे आणि हातापायांची हालचाल एकाचवेळी करावी लागते. स्वीमिंगप्रमाणेच ट्रेकिंगमध्येही संपूर्ण व्यायाम होतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे ह्रदयासह संपूर्ण शरिराला ऑक्सिजनची मागणी वाढते. त्यामुळे ह्रदय मजबूत आणि ह्रदयाशी संबंधित धमन्या व रक्तवाहिन्या सुप्रवाहित होण्यास मदत होते.
– ट्रेकिंग करताना होणाऱ्या शारीरिक हालचालींमुळे अनावश्क चरबी कमी होते. योग्य मार्गदर्शनाखाली सलग १२ आठवडे ट्रेकिंग केल्यास वजनात उल्लेखनीय घट झाल्याचे दिसून येईल.
– भारतात ट्रेकिंगचे आयोजन ट्रेकर्सच्या शरीराला पुरेसा, शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी केले जाते. प्रामुख्याने निर्जन ठिकाणी ट्रेकिंगला ट्रेकर्स आणि टूर कंपन्यांकडून प्राधान्य मिळते. कारण शुद्ध ऑक्सिजन मिळाल्याने फुप्फुस स्वच्छ, निरोगी होते.
– ट्रेकिंग करताना पोट, हात, पाय आणि उर्वरित स्नायूंचा (मसल्स) वापर होतो. त्यामुळे ते बळकट होऊन शरीर लवचिक होण्यास मदत होते.
– ट्रेकिंग करताना तुमचे लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित असायला हवे. यातूनच मन एकाग्र होण्याची सवय जडते. ट्रेकरला येणाऱ्या आव्हानांचा सामना करीत उद्दिष्ट गाठावे लागते. चित्त एकाग्र केल्याने मन आणि मेंदूला शांतता मिळते. शिवाय एखादे काम पूर्णतः लक्ष देऊन तडीस नेण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
– आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ट्रेकिंगचा पर्याय सर्वोत्तम ठरतो. येथून मिळालेला आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडतो.
– आजच्या लाईफस्टाईलचा परिणाम राहणे, खाणे, फिरणे अशा अनेक गोष्टींवर झालाय. ट्रेकिंगमुळे ताणतणावाचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. तसेच यामुळे स्मरणशक्ती बळकट होते.
ट्रेकिंग म्हणजे एक आनंदयात्रा. मात्र, तिचे रूपांतर क्लेशकारक होऊ नये यासाठी काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. उदाहरणार्थ, दर्जेदार शूजचा वापर करणे, त्या-त्या ऋतूनुरूप कपडे घालणे, बॅगमध्ये पाण्याची बाटली, स्नॅक्स आणि गरजेनुसार एनर्जी बार अथवा ड्रिंक्सही असू द्यावे. आकाशात वीज चमकत असल्यास उंचावर जाणे टाळावे. कारण, उंचावर वीज कोसळण्याचा धोका अधिक असतो. एकट्याऐवजी दोन-तीन जण अथवा समूहाने ट्रेकिंग केल्यास अधिक फायद्याचे ठरते. आरोग्याच्या काही तक्रारी असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रेकिंग करण्यासाठी अत्यल्प खर्च येतो. त्यामुळे तो सहजपणे कोणालाही परवडण्यासारखा असतो. प्रत्येकवेळी ट्रेकिंग करताना एखाद्या बॅगमध्ये कचरा जमा करू शकता, तेथे वृक्षरोपण करू शकता तसेच तेथील निसर्गाची देखरेखही करू शकता. यासाठीही कुठलाही खर्च तुम्हाला लागत नाही. त्याचबरोबर बदलत जाणारा निसर्ग तुम्हाला अनुभवता येतो. हा निसर्ग तुम्ही तुमच्या मोबाईल अथवा डीएसएलआर कॅमेऱ्यात कैद करूनही ठेवू शकता. या माध्यमातून तुम्ही तुमच्या विचारांची माणसं जोडू शकता. ट्रेक आणि सामाजिक कामाचे समाधान मिळवू शकता.
जाता-जाता इतकच सांगेन की, ट्रेकिंगला बंधन बिलकुल नाही. मात्र, त्याचे फायदे अगणित आहेत. छानसा पाऊस पडलाय, तर ट्रेकिंगला जायलाच पाहिजे. या ट्रेकिंगमधून बरंच काही शिकायला मिळते. या सुखद वातावरणात शांत बसू नका. उन्हाळ्यात वाढलेला वजनाचा टक्का ट्रेकिंगने तुम्ही नक्कीच खाली आणू शकता.
17 comments
Treking is really different from all other feelings..
Sir Thank you for your valuable guidance
simple & healthy life great sir thanks.
‘Anandyatra’ perfect synonym for treck / trail. Health benefits apart the interaction with nature has multifold other benefits. The air, the morning calm, sounds of birds, insects gives you peace. Unfortunately we see the young generation wants to carry their earphones even in the woods, at times they carry larger Bluetooth speakers spoiling the sanctity of the places they visit, not to mention the plastic and eatables. Responsible Treckking is the need of the hour.
Yes Sir..really great article
R/Sir, Excellent information for All trecers
प्रेरणादायी लेखन आहे सर.मी माझ्या सहकाऱ्यांना आपल्या बद्दल व लेखनाबद्दल नेहमी सांगत असतो. जी व्यक्ती नेहमी व्यस्त असते तीच व्यक्ती वेळ पाळते व नवीन काहीतरी करत राहते .आपण त्याचे एक उत्तम उदाहरण आहात. आळशी व्यक्ती काहीच करत नाही किंवा उशिरा करते किंवा येते.पर्वतारोहन स्वतःच एक प्राणायाम आहे. कारण चढतांना आपले सर्व लक्ष पावलांवर असते.ही झाली एकाग्रता . गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने काम असल्याने श्वास आपोआप खोल होत जातो.हे झाले डीप breathing. सॅल्युट सर!!!!
excellent quote sir ….. ur the real inspiration 👌🏻
सर खूप सुंदर लेख. जे हौशी ट्रेकर आहे त्यांना या मार्गदर्शनाचा खूप उपयोग होईल
हे नक्की..
प्रेरणादाई लेख …
Jai Hind Sir . Highly Motivating and enlightening articles Sir. Especially the one about mobiles Sir. Regards!!🙏🙏🙏
Dear Sir
Thanks for sharing. All your outdoor activities are interesting and motivating.
Best Wishes
Ranjeet
अतिशय माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख,सर..
सर,तुमची प्रत्येक आवड तुम्ही फक्त आवड म्हणून जपत नाही तर त्याचा संपूर्ण आनंद घेता,, त्यातील पॉझिटिव्ह गोष्टींचा शारीरिक आणि मानसिक जडणघडण होण्यासाठी कसा उपयोग होतो हे सुंदररित्या मांडता.
असेच मार्गदर्शन करीत रहा.
पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा..!!
It’s always been an inspirational one……. Sir Thanks for shring
Resp.Sir,
Truly great Article all the things are covered about Trekking, now a day it’s too necessary….
Thanks a lot for making such a useful Article…
Jai Hind Sir…
R/Sir, Excellent information for all.
Respected sir,
जय हिंद सर,
ट्रेकला जाणे का आवश्यक आहे आणि त्यामुळे फिटनेस कसा राहू शकतो याबाबत विस्तृत आणि उपयुक्त अशी माहीती आपण या लेखात दिली आहे सर धन्यवाद. 🙏🙏👌👌👍👍
आदरणीय सर
सर्व लेख उत्कृष्ट आहेत. ट्रेकिंग व वॅकेशन बाबतचा लेख जास्त आवडला. दररोजच्या जीवनासाठी हा एक कानमंत्र आहे सर.
Definitely it’s inspiring and I will adopt it.
Regards sir.
अतिशय सुंदर माहीती सर धन्यवाद सर
Comments are closed.