At least have one hobby for a stress free life

छंद (Hobbies)

दैनंदिन आयुष्य जगत असताना किमान एकतरी छंद जोपासावा. कदाचित हा छंद खेळ, चित्रकला, लेखन, वाचन, फोटोग्राफी, पोहणे, धावणे अथवा पर्यटन कोणताही असू शकतो. तुमचा छंद तुम्‍ही जिवंत असल्‍याची अथवा तुम्‍हाला जगण्याची प्रेरणा देत असतो. छंद नसलेली व्‍यक्‍ती कायम रुक्ष आयुष्य जगत असते तर छंद जोपासणारे आयुष्याचा खरा आनंद घेत असतात. इतकेच नव्‍हे, तर छंद जोपासणाऱ्या व्‍यक्‍तींचा मेंदू इतरांच्‍या तुलनेत तल्‍लख, प्रफुल्‍लित आणि ताजातवाना राहतो हे विज्ञानाने सिद्ध केलंय. त्‍यामुळे स्‍वतःला काय हवं आहे, स्‍वतःचा आनंद कशात आहे हे जाणून घ्यायला हवे. छंद आपल्या आयुष्यात अनमोल आनंद देऊ शकतात. छोट्या छोट्या छंदांतून आपण आयुष्य समृद्ध करू शकतो, असे मला वाटते.

छंद म्‍हणजे नेमकं काय?

छंद म्हणजे स्वत:चा आणि इतरांचाही आनंद. आनंद मिळण्यासाठी व्यक्ती स्वतःची आवड, हौस किंवा विरंगुळा जोपासते त्‍याला छंद म्‍हणणे अधिक योग्‍य ठरेल. तरुण असो वा वयोवृद्ध प्रत्येकाने एक तरी छंद जोपासावा; कारण त्यातूनच आपली ओळख निर्माण होते, खरंखुरं समाधान मिळतं. छंद जोपासणारे आयुष्यात कमी वेळेत अधिक परिपक्‍व होतात. समाज, कार्यालय अथवा व्‍यवसायाच्‍या ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येतो. अप्रत्‍यक्षपणे तुम्‍हाला एक नवी उंची देण्यासाठी तुमचे छंद उपयोगी पडतात.

पोलीस खात्‍यात काम करताना समाजातील वैविध्यपूर्ण संस्‍कृती, वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या व्यक्ती, त्यांचे राहणीमान बघायला मिळते. आतापर्यंत प्रामुख्याने नाशिक येथील कुंभमेळा, संयुक्‍त राष्ट्र, नांदेड येथील गुरू ता गद्दी सोहळा, तसेच नागपूरमध्ये दक्षिण मध्य विभागीय सांस्‍कृतिक केंद्रात महत्त्वाच्‍या पदावर काम करण्याची, तेथील परिस्‍थिती हाताळण्याची संधी मिळाली. त्‍यामुळे प्रत्‍येकवेळी वेगवेगळ्या नजरेतून जगाकडे पाहता आले. फोटोग्राफीचा छंद असल्‍यामुळे जेथे जेथे गेलो तेथील वेगळेपण कॅमेऱ्यातून टिपले. पोलीस खात्‍यातील उच्‍चपदस्‍थ अधिकारी असूनही मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मी काढलेल्‍या निवडक छायाचित्रांचे ९ ते १५ जानेवारी २०१९ दरम्‍यान प्रदर्शनही भरविण्यात आले होते. या छंदामुळे माझी ओळख एक फोटोग्राफर म्‍हणूनही झाली. पोलीस खात्‍यातील उच्‍चपदस्‍थ अधिकाऱ्याने टिपलेल्‍या छायाचित्रांचे प्रदर्शन ही सर्वांसाठी कुतूहलाची बाब होती. हे प्रदर्शन व माझ्या छंदाला लाभलेली दाद यामुळे मला प्रेरणा आणि प्रोत्‍साहन मिळाले.

नांदेडमध्ये १४ जून २००७ ते १९ फेब्रुवारी २००९दरम्‍यान पोलीस अधीक्षक पदावर असताना तिथे शीख धर्मीयांचा गुरू ता गद्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे तत्‍कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्‍यासह जगभरातून अवघ्या सहा दिवसांत लाखोंच्‍या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. त्या वेळी फोटोग्राफीला मोठी संधी मिळाली. त्‍याशिवाय परभणी आणि नांदेडच्‍या सीमारेषेवर असलेल्‍या लोहा तालुक्‍यातील माळेगावला राजस्‍थानमधील पुष्करच्‍या खालोखाल सर्वांत मोठी पशु-प्राण्यांची यात्रा भरते. हे एक भव्य पशुप्रदर्शन असते. या ठिकाणी घोडे, उंट, गायी, बैल, म्हैस, रेडे, गाढव, शेळ्या-मेंढ्या, अस्वल, माकड, वानर, कुत्री, ससे, कोंबडे आदी पाळीव व उपयोगी पशुपक्षी आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यांतून खरेदी-विक्रीसाठी आणले जातात. या यात्रेबद्दल कुतूहलापोटी अधिक जाणून घेण्याच्‍या उद्देशाने पुस्‍तकाचा शोध घेतला. दुर्दैवाने इतक्‍या मोठ्या असलेल्‍या ऐतिहासिक श्री माळेगावच्‍या यात्रेबद्दल कुठेही एकत्रित साहित्‍य उपलब्‍ध नव्‍हते हे माहिती मिळविल्यानंतर लक्षात आले. तेव्‍हा लिहिण्याचा छंद मला स्वस्थ बसू देत नव्‍हता. येथील ग्रामस्थ, अभ्यासक आणि अनेकांकडून या यात्रेबद्दल माहिती जमा केली. त्‍यानंतर ‘माळेगावची जत्रा’ हे पुस्‍तक लिहिले. त्‍यासह ‘पोलिसिंग- ए न्‍यू डायमेन्‍शन’ हे पोलिस खात्‍यावर तर ‘कुशावर्तचा कोतवाल’ हे कुंभमेळ्यावर आधारित पुस्‍तक मराठी भाषेत लिहिले. लेखनाच्या या छंदामुळे माझी ओळख लेखक म्‍हणूनही झाली.

आजघडीला छंदातून पोलीस महानिरीक्षकासह स्‍विमर, रनर, ऑथर, फोटोग्राफर आणि सायकलिस्‍ट यांसारखी नवी ओळख मिळत गेली. त्‍यातून मिळणारा आनंद अतुलनीयच! छंदामुळे तुम्‍हाला आयुष्यात वेगवेगळ्या परिस्थितीशी सामना करण्याची शक्‍ती मिळते. त्‍याशिवाय नवी आव्‍हाने स्‍वीकारून ती पूर्णत्वास नेण्याकरिता दिशाही मिळत जाते. छंद हे एकप्रकारे आयुष्याचे व्‍हॅल्‍यू ॲडिशन असतात. त्‍यामुळे एकतरी छंद जोपासावा अन्‌ त्‍यातून स्‍वतःचा शोध घ्यावा.

जाताजाता- पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.’

Print Friendly, PDF & Email
Author avatar
Dr. Ravinder Singal

29 comments

  1. Manoj Karanje

    Excellent Sir….खरोखर जीवनात छंद असणे अत्यंत आवश्यक आहे…आपण पोलीस खात्यात असुन देखील एक वेगळी ओळख यशस्वीपणे निर्माण केलेली आहे सर…खरच आपण कौतुकास पात्र आहात…

  2. Rakshit Tandon

    Excellent sir and true . One should never leave there hobbies .

  3. Ankita

    I have never met a perfectionist like u…
    After being successful in every part of ur life…u r such a down to earth person…I hav seen u as a best commissioner of police …. as well as giving perfect time Nd value to each n every person who approach u…..even small kids are big followers of ur personality ….I m so happy to know u so well…
    Regards
    Ankita

  4. Truely saidReduce Negative Stress

  5. Dr Pratibha Patil

    Commendable Sir.
    Paintings are amazing.
    Very creative….so much to learn from u Sir

  6. आशिष बनसोडे

    कुठलाही छंद मनुष्याला जगण्याची नवी उर्जा देतो, सकारात्मक भावना निर्माण करतो. छंदाच्या माध्यमातून आपण वेगवेगळी आयाम गाठतो आणि तोच वारसा आपली कायमस्वरूपी ओळख देखील बनवून जातो. सिग्नल सर आपण पोलिस अधिकाऱ्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या छंदातून तुमची वेगवेगळी छबी तयार केली असून ती समाजातील सर्वांनाच motivational राहील.

  7. Gorakh Jadhav

    Very true sir, जीवनात छंद जोपासलेच पाहिजेत …..

  8. मंगेश निवृत्ती मिलखे

    छंद करी मनास बेधुंद!
    निखळून पडती सर्व बंध!!

    उच्च पदावर विराजमान राहून सदैव व्यस्त जीवन शैली असताना जोपासलेल्या छंदांना व उत्तुंग आत्मविश्वासाला सलाम!

    तुमच्या अप्रतिम लेखनीमुळे व प्रेरणादायी गाेष्टिंमुळे सुचलेल्या हया दाेन आेळी तुमच्या सारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला समर्पित……….

    उच्च पदावर विराजमान राहून सदैव व्यस्त जीवन शैली असताना जोपासलेल्या छंदांना व उत्तुंग आत्मविश्वासाला सलाम!

  9. नम्रता देसाई

    Respected sir,
    सर आपले खूप खूप धन्यवाद .At least have one hobby for stress free life वाचले आपल्या मधील अभ्यासू लेखकास शतशः प्रणाम आपण दिलेला संदेश आम्हास मार्गदर्शक राहील. धन्यवाद सर

  10. Bajirao Mahajan

    Khup chaan sir..tumche likhan prernadai aahe..tumchya sahwasat rahta aale yacha Aanand aahe..nakkich Maza wachnacha chhannd ani excercise doghehi suru theu..aapan kautukas patr aahat..Hindi bhashik asun Marathi pustake lihili..kharech great..all the best sir…dhanyawad

  11. Shailendra Gaikwad

    अगदी खरं आहे!!
    जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी छंद पाहिजेच.
    प्रत्येकाने वाचावा आणि आत्मसात करावा असा लेख!!

  12. Hanaumandas. Dhoot

    Very Beautiful

  13. Ajit Khandare

    छान आहे एकदम. सर तुम्ही मराठी मस्त लिहता.

  14. Sunita Bhagure Chauwhan

    नमस्कार सर , अतिशय सुंदर लेख आहेत सर.
    मी ,तुम्हाला खूप जवळून पाहिले आहे,.
    ‘ साधी रहाणी, उच्च विचारसरणी ‘ असं तुमचं व्यक्तिमत्त्व आहे. तुमची कामावरची निष्ठा, तुमच्यातली निरागसता आणि कलाप्रेम तुम्ही जपलं आहे, त्यामुळेच सदैव प्रफुल्लित, हसतमुख आणि कर्तव्यत्पर आहात.
    या लिखाणाद्वारे अनेकांना जगण्याची उर्मी मिळेल.

    सर ,असेच उत्तमोत्तम लेख आम्हाला वाचायला मिळोत…..असेच लिखाण चालू राहू द्या..!!
    अनेक सदिच्छा..!!💐💐

  15. Jyotiwaghchaure

    Sir, You are truly inspiration to us!

  16. Sunita Bhagure Chauwhan

    अतिशय मोटिवेशनल लेख …!!
    सर, तुम्हाला खूप जवळून पाहिलय मी..!
    ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ असे तुमचे व्यक्तिमत्व आहे.
    तुमची कामाप्रती प्रचंड निष्ठा, तुमच्यातली निरागसता आणि कला प्रेम तुम्ही जपलं आहे आहे. त्यामुळेच सदैव प्रफुल्लित ,हसतमुख आणि कर्तव्यत्पर आहात.

    या लिखाणाद्वारे अनेकांना जगण्याची नवी उर्मी मिळेल.

    आम्हाला असेच उत्तमोत्तम लेख वाचायला मिळोत ,सर..
    लिखाण असेच सुरू राहू द्या सर…
    अनेक सदिच्छा..!💐💐

  17. Atul Mahashabde

    Incredible thought. 🙏 we do realised the importance of keeping hobby. please keep writing & sharing.

  18. Vinaya

    Lovely and inspiring to read this, Sir!

  19. Api Sarika Ahirrao

    Res sir Jaihind…..
    Article is Very nice sir…. You are all rounder personally…. Really proud of you sir…. And a grand salute to you sir…!!!

  20. AJAY YASHWANT PANDIT

    पु. ल. देशपांडेंनी दिलेला संदेश तुम्ही खरोखर नुसता आचरणात आणला नाही तर इतरांना प्रेरणा देऊन त्यांच्यात एक सकारात्मक बदल घडेपर्यंत तुम्ही काम करू शकला.त्याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद……!!!

    तुमच्या सर्व मनोकामना,महत्त्वाकांक्षा आणि अंगी असलेले छंद पूर्ण होवोत ह्या मनपूर्वक शुभेच्या……!!!

  21. Raj.luthra

    SELF ANALYSIS..is what life is meant for.
    Superb …

  22. Dr Deepak Shinde

    मी जवळून आपले छंद पाहिले आहेत, नोकरीचे सर्व सोपस्कार जपून माळेगाव च्या यात्रेत जुने कॅमेरे , ऐतिहासिक वस्तू शोधत फिरताना आपण एक अधिकारी आहात हे सुद्धा विसरून जात अगदी तल्लीन होऊन त्या वस्तू व कला याला दाद देत आपण फिरत असत , खरोखर आपल्या सारखा अधिकारी , मित्र, मार्गदर्शक मिळणे भाग्य आहे , आपल्या छंदिष्ट स्वभावाला सॅल्युट ।।।

  23. Sheetal Gaikwadl

    Excellent !!!!! sir…प्रतिभासंपन्न

  24. Tarannum kadri

    Incredible Sir . You a true guiding force to all of us .
    Indeed getting out of the routine and practising your hobbies is like rejunevating oneself .
    Keep inspiring us 👍🏻🙏🏻

  25. Kishor chaudhari

    एक तरी छंद हवाच .छंद फावल्या वेळी करावयाची गोष्ट नसून ,हीच तर आयुष्यात करावयाची मुख्य गोष्ट आहे. “कुशावर्ताचा कोतवाल” या आपल्या पुस्तकाबद्दल शरद पवारांनी नाशिकला आल्यावर खास वाचण्यासाठी आपल्याकडून मागून घेतले होते ,हे माहीत होते परंतु “माळेगावाची जत्रा’ हे देखील आपन लिहिले एकूण आश्चर्य वाटले व आनंद झाला , म्हणजे मुळात तुम्ही multitasking आहात. Great, salut Sir

  26. Chandulal Shah

    सर, आपला लेख खूपच छान आणि अनेकांना प्रेरणादायीं आहे. आपण केवळ एक वरिष्ठ अधिकारीच नाही आहात तर समाजासाठी आदर्श व्यक्ति आहात. आपण जोपासलेले छंद म्हणजे आवड़ असेल तर सवड नक्कीच काढ़ता येते. या लेखातून प्रेरणा घेऊन माझ्यासह सर्वांनी एक तरी छंद जोपासावा असे वाटते. आपण असेच लेखन करण्यासाठी माझ्या शुभेच्छा !

  27. Yes sir your right जीवनात छंद जोपासले पाहिजेत……
    सर खुप खुप धन्यवाद.
    लेख खुप छान आहे.

  28. Dr MANISHA RAUNDAL

    Very nice sir
    You itself proved that…..for passion ,there is no age limit….every one can develop it in any time
    You are great motivater…….
    Proud of you

Post a comment

Your email address will not be published. Required fields are marked *