Be conscious, in the era of smartphones...

आजघडीला प्रत्येकजण इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये अडकून पडलेला दिसतोय. त्यातही स्मार्टफोनने सर्वाधिक आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. अगदी पंधरा वर्षापूर्वी मोबाईल आला अन् आता त्याने अपडेट स्वरूप धारण केले. स्वतः अपडेट होत असताना लोकांना कधीही अपडेट होऊ दिले नाही. आजघडीला व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद दिवसेंदिवस खुंटत चाललाय. त्याला स्मार्टफोनने अधिक बळकटी दिली. त्यामुळे बालक-पालक, नातेसंबंध, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांत होणारी चर्चा, विचारांची देवाणघेवाण बंद होत असल्याचे बोलले जात आहे. बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी ही धोक्याची घंटा मानायला हरकत नाही. सामाजिक स्वास्थ्य बळकट राहावयाचे असल्यास व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद आवश्यक आहे.

प्यू रिसर्च सेंटरने (Pew Research Center) स्मार्टफोनमुळे नातेसंबंधांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. त्यात त्यांना असे लक्षात आले की, ५० टक्के लोक मोबाईलशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. आजघडीला बाजारात जा, कार्यालयात जा अथवा बेडरूममध्ये झोपायला जा. प्रत्येकजण हातात स्मार्टफोन घेऊन सोशलमिडीया सुरू करून सक्रोलिंग करायला सुरू होतो. या परिस्थितीत तुमचा मित्र-मैत्रिण, तुमची आई, पत्नी आणि मुलेही कंटाळून तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. कारण, प्रत्यक्ष सोबत असलेल्या व्यक्तींशी संवाद करण्याऐवजी स्मार्टफोनच्या अधीन झालेला व्यक्ती एका वेगळ्याच आभासी दुनियेत जगत असतो. या जगामध्ये खरं काहीही नसते.

 

भारतात टीव्हीचा प्रचार-प्रसार होण्यापूर्वी घरामध्ये सर्व कुटूंब किमान एकवेळा एकत्र येऊन जेवण करीत असते. त्यामुळे दिवसभरातील घडामोडींबद्दल चर्चा व्हायची. अगदी पंचवीस वर्षापूर्वी टीव्ही आला अन् कुटूंबातील संवाद हिरावण्यास सुरूवात केली. त्यानंतर २००० नंतर संगणक, इंटरनेट आणि मोबाईलचाही शिरकाव झाला. या गॅझेटनी अक्षरक्ष विकसित, विकसनशील आणि अविकसित देशांतील लोकांना वेड लावले. पुढे स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशलमिडीया यांनी एकत्रित येऊन लोकांमधील संवादाला होत्याचे नव्हते करून टाकले. सर्वजण एकमेकांपासून दुरावण्यास सुरूवात झाली.
माझ्या मते, कोणत्याही टेक्नॉलॉजीचा वापर योग्य केल्यास तो चांगलाच आहे. मात्र, त्याचा अतिवापर केल्यास दुष्परिणामही होणारच आहेत. हे लक्षात घ्यायला हवे. फेसबुक, ट्विटर, इन्सटाग्राम, यु-ट्युब, टिक-टॉक वगैरे वगैरे सोशलमिडीयावर जितके सक्रिय आहात, त्यापैकी किमान काही वेळ आपले कुटूंबिय, मित्र आणि सहकाऱ्यांसोबत घालविल्यास अधिक फायद्याचे ठरू शकेल. विशेष म्हणजे नैराश्य, यश-अपयश, दैनंदिन अडचणी सोडविण्याचे कसब हे आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांशी बोलून निर्माण होईल. आभासी जगाशी बोलून काहीही उपयोग होणार नाहीत. त्यासाठी कामाच्या व्यापातून किमान थोडावेळ काढून कुटूंबिय आणि मित्रांसमवेत अंताक्षरी, कॅरम, बुद्धिबळ आदींसारखे खेळ खेळावे. किमान एखादा तास तुम्ही देऊ शकलात तर कुटूंबियांशी नाळ घट्ट होण्यास मदत होईल. इतकेच नव्हे तर वर्षातून किमान एकवेळा कुटूंबासोबत सहलींचे आयोजन करावे. स्मार्टफोनऐवजी आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींशी नाते जोडा. त्यातून मिळणारा आनंद जगातील कुठलेही तंत्रज्ञान, स्मार्टफोन देऊ शकणार नाही. त्यामुळे मोबाईला नको, तर नात्यांना हो म्हणा. त्यासाठी तुम्हाला खालील टिप्स नक्कीच उपयोगी पडू शकतील.

 

1) मोबाईल फोनच्या वापरावर लक्ष ठेवा, त्यासाठी असलेल्या काही सेलफोन युज ट्रॅकिंग ऍपचीही मदत घेता येईल.
2) किती वेळ आणि कधी मोबाईल वापरायचा आहे, हे निश्‍चित करा, तो कोणत्या वेळी वापरायचा नाही हे ही ठरवा. तुमचे नियोजन कागदावर लिहून ठेवा.
3) मोबाईलच्या वापराचा वेळ कमी झाला असेल, तर स्वतःला एखादे छानसे बक्षीस द्या.
4) एकदमच मोबाईलचा वापर कमी करण्यापेक्षा, त्याचा वेळ हळू हळू कमी करा. तुमच्या फोनचा वापर फक्त गरजेपुरता किंवा संभाषणासाठीच करा.
5) कामात असतांना, अभ्यास करत असतांना मोबाईल तुमच्यापासून लांब ठेवा, किंवा सायलेंट मोडवर ठेवा.
6) आठवड्यातून एकदा तरी मोबाईलला सुटीवर पाठवा. मोबाईल फोनचे नेटवर्क येत नसलेल्या ठिकाणी ट्रीप किंवा कॅंपींगला जा, येथे आपोआपच तुम्ही तुमचा मोबाईल बंद कराल.
7)फोनच्या सेटींग बदला. एखादा ई- मेल, संदेश आला तर त्याचे नोटिफिकेशन मिळत असले, तर ते नोटिफिकेशन आधी बंद करा. त्यामुळे तुमचे लक्ष सारखे फोनकडे जाणार नाही.
8) मोबाईल फोनबाबतचे तुमचे विचार बदला. फोनचा वापर करण्यासाठी आपण उतावीळ होतो, पण याच वेळेला स्वतःला समजवा की, फोन तपासणे एवढे महत्वाचे नाही आणि ते नंतरही करता येईल, यापेक्षा इतर कामे जास्त महत्वाची आहेत.

Print Friendly, PDF & Email
Author avatar
Dr. Ravinder Singal

6 comments

  1. NEED OF THE HOUR!!

    Every parent, every youth and every teenager must read and get insight….

  2. Nilesh Ambekar - Thane

    १६ आने सच
    मराठीत एक जुनी म्हण आहे
    कामा पुरता मामा आणि ताका पुरती आजीबाई
    मोबाइलला वरील म्हणी प्रमाणे वापरले तर खूप फरक पडेल

  3. Vilas Deshmane

    Best worded . Useful for guidance of all aged people.

  4. हो सर खरंच मोबाईल मुळे खुप वेळ वाया जातो .खरं आठवड्यातून एकदा मोबाईलला सुट्टी हवीच …

  5. Prof Dr Deepak Shinde

    EXACTLY TRUE
    NEED OF HOUR SIR
    EXCELLENT ARTICLE SIR

Post a comment

Your email address will not be published. Required fields are marked *