Sunday, April 23, 2017 Thanks

*अंधारातून प्रकाशाकडे जाणार्या मार्गावरील वाटाड्याः डाॕ.रविंद्र सिंघल*
आपण आज जिथं आहोत त्या स्थानाचं मोठेपण समाजाच्या अस्तित्वाशी जवळचं नातं सांगते,ही जाणीव जिथे असते तो समाज कधीच अंधारात चाचपडत नाही.समाजाला प्रकाशाकडे घेऊन जाणार्या वाटा आपोपाप उजळत जातात.या वाटेवर मग एखाद्या प्रवाशाने मार्गक्रमण करण्यास सुरूवात केली की सहप्रवाशी जोडले जातात.आणि मग अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार्या मार्गावर प्रवाशांचा थवा धावू लागतो,या थव्याला योग्य दिशेने घेऊन जाणार्या वाटाड्या माञ हवा असतो.नाशिककरांच्या सुदैवाने हा वाटाड्या लाभला,होय!रविद्रकुमार सिंघल…नाशिकचे पोलीस आयुक्त.
साधारण आठ महिन्यांपुर्वी नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून रविंद्र सिंघल यांनी सुञे स्वीकारली तेंव्हा कायदा सुव्यवस्थेच्या पातळीवर थर्ड डिग्री शहर म्हणून नाशिकचा उल्लेख होऊ लागला होता.खरं तर कायदा सुव्यवस्था ढासळण्यास सर्वस्वी पोलीसच जबाबदार असतात,हा समज दृढ करून ,प्रचलित करून समाज आपली जबाबदारी झटकत असतो.रविंद्र सिंघल पो.आयुक्त म्हणून शहरात दाखल झाले तेंव्हा साधारण हीच परिस्थिती होती .परिस्थिती मान्य करून कायद्या सुव्यस्थेला वळणावर आणण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले.रविंद्र सिंघल यांचे नाशिकशी असलेले नाते तासे जुनेच.पार्श्वभुमी ठाऊक असलेल्या पोलीस आयुक्तांना नाशिककरांच्या बदलत्या मानसिकतेचा अभ्यास करण्यास फार वेळ लागला नाही.अल्पावधीतच पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील अधिकारी कर्मचार्यांच्या सहकार्याने कायदा सुव्यवस्थेला वळण देण्यास यश प्राप्त केले.अर्थात वर्षानुवर्ष पोलीस आयुक्तालयात राहुन अस्तनितल्या निखार्याच काम करणार्या प्रवृत्तींचा बंदोबस्त त्यांनी केला.हे मुद्दामहून सांगण्याची गरज नाही.घर सुधारले तर समाजाला उपदेश करण्याचा अधिकार प्राप्त होतो.हे पो.आयुक्तांनी कृतीने दाखवून दिले. आज नाशिक शहर पुर्ण नसले तरी तुलनेत सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते.त्याचे सारे श्रेय अर्थातच सेनापती रविंद्र सिंघल आणि त्यांच्या सैन्यदलातील पो.उपआयूक्त लक्ष्मीकांत पाटील,विजय पाटील ,दत्ताञय कराळे,श्रीकांत धिवरे एसीपी राजू भुजबळ ,सचिन गोरे,विजय चव्हाण,अतूल झेंडे,पो.नि.डाॕ,सिताराम कोल्हे,मधुकर कड,सोमनाथ तांबे,बर्डीकर,लोहकरे ,न्याहाळदे,मंगलसींग सुर्यवंशी,पंढरीनाथ ढोकणे, अशोक भगत,नम्रता देसाई, भाले,अहिरराव शेगर अशा असंख्य अधिकारी हजारभर पोलीस कर्मचारी यांच्या मेहनतीलाच जाते. याविषयी नाशिककर खाञी बाळगून आहेत.
कायदा सुव्यवस्थेच्या पातळीवर नाशिक,पोलीसांच्या टप्यात आल्यानंतर कायदा सुवस्था ढासळण्यास कारणीभुत असलेल्या घटक,बाबींचा आयुक्तांनी अभ्यास केला.अगदी मुठभर गुन्हेगारी प्रवृत्तींमुळे समाज गुन्हेगारीच्या विळख्यात सापडतो,दहशतीमुळे समाज या गुन्हेगारांविषयी साक्ष देण्यास धजावत नाही.त्याचे कारण पुन्हा पोलीसच, पोलीसांविषयी चलचिञ दृकश्राव्य माध्यमांमधून निर्माण झालेला गैरसमज,माध्यमांनी उभी केलेली पोलीसाःची खलनायकी प्रतिमा.परिणाम पोलीस- जनतेत दुराव्याची भिंत उभी राहीली.ही भिंत पाडण्यासाठी पोलीसांची प्रतिमा बदलण्याचे काम पोलिस आयुक्तांनी केले.आपल्या सहकार्यांचा ब्रेन वाॕश करीत असतांना पोलीसांचा माणूस म्हणून समाजातील वावर वाढण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केले.रुंदावलेली दरी कमी होण्यास मदत झाली.काम संपले नव्हते.गुन्हेगारी प्रवृत्तीला उघडे पाडण्यासाठी समाजाला प्रोत्साहीत करणे आवश्यक होते.पण त्यासाठी ,समाजाला विश्वासात घेणे क्रमप्राप्त आहे.आपण समाजाचे देणे लागतो ही भावना प्रत्यक्षात कृतीत आणणे आवश्यक आहे.याची जाणीव असलेले,ठिकठिकाणी सामाजिक बांधिलकी जपलेले सिंघल यांनी नाशिकमध्येही समाजाचं देणं परत करण्यास सुरूवाता केली.निकोप समाजच गुन्हेगारीचा पुरता बिमोड करू शकतो हे अनुभवातून माहीता असलेल्या पो.आयुक्तांनी स्वतःहून पाऊल पुढे टाकत विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन अंमल केला.त्याची प्रत्यक्ष फळे नाशिककरांना चाखायला मिळत आहेत.पोलीस आयुक्तांच्या या सामाजिक बांधिलकीच्या चळवळीत शहरातील असंख्य सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था स्वयंस्फुर्तीने सहभागी होतांना दिसतात.
आपले घरदार,बायका पोर,म्हातारे आई वडील सण उत्सव सारे विसरून नाशिककरांचे समारंभ शांततेत बिनधोक पार पडावेत,म्हणून उन वारा थंडी पावसाची फिकीर न करता तहानभुक विसरून रस्त्यावर चोवीसतास बंदोबस्त देणार्या खाकीच्या शिलेदाराला शाबासकी तर मिळायलाच हवी ना! हीजाणीव नाशिककरांमध्ये जागी झाली आणि काही स्वयंसेवी संघटना,कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून थँक टू नाशिक पोलीस हा स्तूत्य उपक्रम पुढे आला,शहरातील ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात जाऊन नाशिककर पोलीस दलाविषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.अशाच कृतज्ञतेतून आणि पोलीस आयुक्तांच्या सामाजिक जाणीवेतून एज्युकेशन टू बेगर्स चाईल्ड ही नवी संकल्पना जन्माला आली.त्या संकल्पनेने आज सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या प्रांगणात शनीवार दि.२२एप्रिल २०१७ रोजी मुर्त रुप घेतले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॕ.सीताराम कोल्हे यांच्या यशस्वी शिष्टाईने पोलीस आयुक्तांच्या मनातील ही नाविन्यपुर्ण संकल्पना मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी उचलून धरली आणि अवघ्या बारा तासात प्रत्यक्ष अंमलातही आणली.शहरात भीक मागणार्या कुटूंबातील मुले,पालक नावाचा आधार नसलेले अनाथ,चौकात,सिग्नलवर भीकेची याचना करणार्या उपेक्षितांच्या आयुष्याला आकार देण्याचे उत्तरदायित्व पोलीस आयुक्तालया आणि मानवधन संस्थेने स्वीकारले आहे.या पविञ कार्याचा शुभारंभ अर्थातच पोलीस आयुक्तांच्या हस्ते झाला.यावेळी मानवधन संचलित धनलक्ष्मी माध्यमिक विद्यालय,धनलक्ष्मी ज्युनियर काॕलेज, प्रोग्रेसीव्ह इंग्लिश मिडीयम स्कुल ,ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कुलचे गुरूशिष्य आ.देवयांनी फरांदे,शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते,नगरसेविका स्वाती भामरे,हिमगौरी आहेर-आडके,भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा केटीएचएमचे प्रिन्सिपाॕल व्हि.बी. गायकवाड,डाॕ.शैलेंद्र गायकवाड मनपा शिक्षण मंडळाचे शिक्षण अधिकारी नितीन उपासनी महावितरणचे उपअभियंता राजेंद्र भांबर  निवृत्त पो.अधिकारी भामरे पोटे,मेढे सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना तांबट पो.उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील,सहा.पो.आ.राजू भुजबळ यांच्यासह असंख्य पोलीस कर्मचारी आणि नाशिककरांनी हा सोहळा याची डोळा अनुभवला.वपोनि डाॕ.कोल्हे यांनी अल्पवेळेत केलेले नियोजन खाकीआड दडलेल्या माणुसकीचे दर्शन देऊन गेले.
तात्पर्य इतकेच की आठ महिन्यापुर्वीचे नाशिक पोलीस नाव कानावर पडले तरी तुच्छतेने व्यक्त व्हायचे किंवा पोलीस म्हणजे नसता डोक्याला ताप एव्हढ्या दहशतीखाली होते.तेच नाशिककर पोलीसांना धन्यवाद देण्यासाठी बिनधास्तपणे पोलीस ठाण्याची पायरी चढू लागलेत.इतका सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद पोलीसांच्या सामाजिक जाणीवेत आहे हे पो.आयुक्तांच्या एकुण टीमने सिध्द केले,नाशिककर केवळ धन्यवाद देऊन थांबले नाहीत तर पोलीस आयुक्तांच्या जाणीवेतून अंधारात चाचपडणार्या प्रकाशाकडे नेणार्या वाटा उजळत गेल्या त्या वाटेवर आयुक्तांचा सहप्रवासी म्हणून नाशिककरही चालू लागलाय.त्याचे श्रेय पुन्हा एकदा ही वाट दाखविणार्या रविंद्र सिंघल नामक अवलिया वाटाड्यालाच द्यावे लागेल.ही वाट थांबणार नाही,नाशिककर थांबू देणार नाही एव्ढे अभिवचन आम्ही पाळले तरी या वाटाड्याचे परिश्रम सार्थकी लागले असे म्हणता येईल.
*कुमार कडलग* ,
दै.लोकमंथन नाशिक.
User Avatar
Dr. Ravinder Singal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *