आज १२ एप्रिल !
आजच्याच दिवशी २०११ साली अरुणिमा सिन्हा दिल्लीला जाण्यासाठी पद्मावती एक्स्प्रेस मधून प्रवास करत होती. राष्ट्रीय पातळीवर व्हॉलीबॉल आणि फुटबॉल खेळणार्या अरुणिमा सीआयएसएफच्या भरतीसाठी दिल्लीला जायचं होतं.पण गाडीत असलेल्या काही गुंडांनी तिची पर्स आणि गळ्यातली सोन्याची चेन खेचण्याचा प्रयत्न करत असताना अरुणिमाने विरोध केल्यावर त्यांनी तिला धावत्या गाडीतून फेकून दिलं. तिचं दुर्दैव असं की ती ज्या ट्रॅकवर फेकली गेली त्याच ट्रॅकवरून दुसरी गाडी धावत आली आणि अरुणिमाचा एक पाय गाडीखाली गेला आणि डॉक्टरांनी तिचा जीव वाचवण्यासाठी पाय कापला. आता उरलेलं आयुष्य तिला कृत्रिम पायावर काढायची वेळ आली होती.
अनेक संस्थांनी आणि सरकारी योजनांनी तिला आर्थिक मदत केली. सरकारी नोकरी देखील मिळाली पण अरुणिमाला त्यापलीकडे जाऊन ती ‘स्वयंसिध्दा’ आहे हे सिध्द करायचं होतं. अरुणीमाची गोष्ट वेगळीच होती! गाडीखाली तिचा पाय गेला होता पण तिचं मन आहे तसंच अभंग होतं. याच अभंग मनानेच तिच्या आत्मविश्वासाला आधार दिला. २१ मे २०१३ या दिवशी तिने एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले. तिथे पोहचणारी जगातील ही एकमेव अपंग महिला आहे.
या कथेचं तात्पर्य असं की,
आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य ते शक्य करणं हे शक्य आहे पण आत्मविश्वास अभंग ठेवणं हे फार महत्वाचं आहे.
Quitters Don’t Win and Winners Don’t Quit.
Ironman | Deccan Cliffhanger | Comrade Legend Finisher | Motivational Speaker | Writer | Endurance Athlete